Woh sham, to quote Gulzar, kuch alag hi si thi, ajibo-gajab thi woh. Yes, the charmed evening of March 12 was indeed unique. Special it was 'coz it witnessed the celebration of the art and life of one of the most gifted geniuses of the golden era of Hindi film music, Madan Mohan.
Madan Mohan is undoubtedly the emperor of excellence, a musicians' musician. He is the darling of both the classes and the masses. The likes of Begum Akhtar and Talat praised him. Vilayat Khan composed interludes for his songs. Rais Khan regularly played the sitar for him. Be it a complex Hindustani raag or the south Indian version, his songs needed tops three minutes to work magic with such intricacies.
As for the masses, he made the common man fall in love with the subtleties of classical music. He so rendered the semi-classical thumri, dadra that they became the common favourites, just like his flawless ghazals. He could use folk forms as well as the westernised tunes with equal felicity. Why, he is the only music director to use the 'soft whisper' format for a love song . Remember "tumse kahoon ek baat paron se" from his National Award winning "Dastak"?
He moulded the magic of Lata's melodious voice. Just as Talat's and Rafi's silvery voices mesmerised us in his songs, Asha and Kishore's ebullience evolved in to supreme tunefulness in his compositions. Talented newcomers found in him a great mentor.
His roughly six hundred seventy five compositions from over hundred films speak to our heart. This master of mood music created mesmerising songs that evoke our deepest emotions. Sure the poets who wrote for him were great lyricists. Yet, basically, it was his great tunes that talk directly to the very core of our very soul, be it a love song of every possible hue or a patriotic song or a mehfil song or a Qawwali or the folk exuberance as they faultlessly reflected the situation/the context in the particular film.
The "Dil Dhoondta Hai" programme on March 12 was simply superb because explaining these excellences to us was his son, Sanjeev Kohli. In the first half of the programme, Sanjeevji presented a video to chart the journey through his father's timeless music. In addition to a medley of Madan Mohan's hundred best (tough choice!) songs, the video presentation had great nuggets of opinions of-n-by his contemporaries, his singers, the actors who gave screen presence to his ditties, and the poets whose witchery of words enhanced his magic.
The second half, a compered question-answer session with lovely video inputs, was truly touching. Here was a son who was upfront about the disappointments his highly talented and hugely principled father faced. Thus emerged an era of genuine creative people who could be friends despite professional competition. Thus could we catch glimpses of a highly sensitive soul who was commitment personified as Sanjeevji's anecdotes repeatedly revealed.
Sanjeevji's deeply emotional confessions were laced with a subtle dash of humour which did not allow the programme to wallow in to idolatry, a great asset indeed! Dr. Rajeshree Gokhale Madam as emcee was truly what good compering should be, supportive but non-intrusive. A fantabulous evening, in brief! Mitra foundation and the Gokhale family absolutely deserve a huge 'thank you'! True, it is a labour of love for Sanjeevji, but we, the ardent audience of Madan Mohan, owe him a huge and forever sense of gratitude for this lovely collage of memories and medleys.
Pratima Agnihotri @ The evening was a most pleasant 'rangpanchami' of 'sapt sur', great poems set to memorable music, coloured with the deep love and respect of a devoted son dedicated to forever keeping his father's memory creatively alive.
A blog by Pratima Ramchandra Agnihotri, Pune
N.B.:
Today, on July 14, I would like to add a footnote to this tribute to Madanji. July 14 is the Bastille Day, the high point of the French Revolution. Just as the French Revolution made the dream of "liberty, equality and fraternity" accessible to the common man, in the field of Hindi film music, Madanji made the classical "sur" comprehensible to every common listener. His ghazals have made Hindi film music a republic of sur, tal, laya. Huge respect to the eternal memory of his great music-making on his Death Anniversary!🙏🙏🙏
Pratima R.Agnihotri
सुरांचा शहेनशाह
ब्लर्ब:
अवीट गोडीची अप्रतिम गाणी सादर करून आपले भावविश्व समृद्ध करणाऱ्या मदन मोहनचे हे जन्मशताब्दीवर्ष. या निमित्ताने ही रसग्रहणात्मक श्रद्धांजली.
सुरांचा शहेनशाह
संध्याकाळ दाटून येत असावी. महानगरातला चुकार पक्षी कुठल्याश्या टोलेगंज इमारतीतल्या दहाव्या-अकराव्या मजल्यावरच्या खिडकीबाहेर डोकावणाऱ्या तशा जुनाट मॉडेलच्या वातानुकूलनयंत्रावर बांधलेल्या आपल्या ओबडधोबड घरट्याकडे परतत असावा. गच्च अंधार ह्लोजीनच्या पिवळट प्रकाशाने अजूनच काळोखलेला वाटावा. “आज सोचा तो आंसू भर आये,” लतादीदींचे दैवी सूर कुठूनसे तरंगत यावेत. पाठोपाठ रईस खान यांच्या मातब्बर सतारीने तोच उदास तराणा छेडावा. शाम-ए-गमच्या प्याल्यात आपण असे डूबत राहावे ते मदन मोहनच्या अवीट गोडीच्या मखमली सुरांच्या साथीने.
मदन मोहनचे तरल पार्श्वसंगीत असे आणि इतके भावविभोर आहे की सुरांचा हा शहेनशाह आपल्या हरेक मन:स्थितीला साथ करत राहतो. “ तुम जो मिल गये हो” या ‘हसते जख्म’ या चित्रपटातील गाण्यामध्ये सफल प्रेमाचा अवखळ उत्साह भीमपलासीच्या साथीने तर सजतोच. पण मरीन ड्राईवच्या उफाणलेल्या समुद्राची गाजही मदन मोहन अशी आगळी वापरतात की ‘समा बंध जाता है’!
मदन मोहनची पार्श्वसंगीताची कारकीर्द तशी छोटेखानी. अवघ्या पंचवीसेक वर्षांची. १९५० साली “आंखे” पासून सुरु झाला हा स्वरविलास. १९५१ सालच्या “अदा” पासून त्या अवीट गोडीच्या अनवट सुरावटीत मिसळला लतादीदींचा दैवी सूर. १९७५ साली जरी सूरांचा हा प्रवास लाक्षणिक अर्थाने संपला तरी मदन मोहनची शेकडो गीते आपल्या श्रवणशक्तीला श्रीमंत करतच राहतात.
त्यातच त्यांच्या सुपुत्राने, संजीव कोहली यांनी, त्यांच्या काही न वापरल्या गेलेल्या सुरावटी २००४ साली “वीर झारा” साठी वापरल्या. आणि मदन मोहन यांच्या मोहक संगीताचा कारवां केवळ “दो पल”का कधीच नव्हता हे एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा नि:संशय सिद्ध झाले. हे यश त्यांच्या चाहत्यांसाठी हळवे करणारे आहे कारण अप्रतिम गाणी पुन्हापुन्हा पेश करूनही घवघवीत म्हणावे असे यश मदन मोहनना हुलकावणी देत राहिले. ‘दस्तक” मधल्या त्यांच्या गहिऱ्या सुरावटीना राष्ट्रीय पारितोषिकाचा साज चढला. पण एकाहून एक सरस कलाकृतीना मिळावा तसा न लाभलेला प्रतिसाद त्यांच्या जिव्हारी लागत राहिला.
मदन मोहनचा उमेदीचा काळ हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ म्हणता येईल. नक्षत्रांच्या या मांदियाळीत मदन मोहनचे स्थान ध्रुवताऱ्याइतकेच अढळ आहे कारण मदन मोहननी चित्रपट संगीताला शास्त्रीय संगीताच्या बैठकीचा नूर दिला. मदनजींचे जवळजवळ प्रत्येक गाणे शास्त्रीय संगीतावर, रागदारीवर आधारलेले आहे.
काही उदाहरणे आपण वानगीदाखल पाहूयात. “तेरी आंखो के सिवा” झिंझोटी वर, तर “जरा सी आहट होती है तो” यमन कल्याण वर बेतलेल आहे.”ये दुनिया ये मेहफिल”चा दर्द भैरवीने आधिक गहिरा होतो, तर या लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेले “आज सोचा तो” किरवाणी रागाच्या सुरावटीत मुद्दतोंसे हरवलेल्या मुस्कुराहटला हुडकत राहते. ‘हसते जख्म’ याच चित्रपटातील “बेताब दिल की” हे उत्कट प्रेमगीत दाक्षिणात्य चारुकेशी रागावर आधारित आहे. “अगर मुझ से मोहब्बत है” प्रेमाची ग्वाही देते दरबारी च्या साक्षीने.
मदन मोह्नना राष्ट्रीय पारितोषिक मिळवून देणाऱ्या “ दस्तक” मधले “ हम है मतां-ए-कुचा बाजार की तरहा” हा सिंध भैरवीचा अविष्कार आहे. मदन मोहनची “सिग्नेचर ट्यून” समजता येईलसे स्वत: मदन मोह्ननी लतादीदींच्या साथीने गायलेले “ माई री मै कासे कहुं पीड अपने जिया की” मिश्र बागेश्री रागाची झलक सादर करते. खरे तर, मदन मोहनचे हरेक गाणे रागदारीत असे गुंफलेले आहे की रोहित कटारिया सारखे मन्झे कलाकार व युट्यूबर एकेका रागावर भलेमोठ्ठे प्रोग्राम्स करतात. शास्त्रीय सुरांवरची मदन मोहनची पकड अशी जबरदस्त आहे की “मौसम” मधले “दिल ढून्ढता है” हे गाणे प्रेमगीत म्हणून पिलू धून वापरते, तर तेच गाणे आठवांनी उदास झालेले मन सादर करताना काहीसे खमाजच्या, थोडेसे बिहागच्या अंगाने जाते.
थोडक्यात सांगायचे तर चित्रपट संगीताला शास्त्रीय संगीताची बैठक दिली ती नौशादच्या बरोबरीने मदन मोहनने. त्यासाठी वापरला गेलेला वाद्यसंचही असाच साजरा होता. मदन मोहनचे खास वाद्य म्हणजे सतार. अनेक गीतात, विशेषतः गझल ही स्वत:ची खासियत सादर करताना, मदन मोहन सतारीचा अतिशय कुशल व संवेदनशील वापर करतात. अनेकदा गायकाच्या आवाजाइतकीच सतारीची धूनही गाण्यातला भाव तरलपणे व्यक्त करण्यासाठी मदन मोहन वापरतात. बासरीच्या अनवट सुरांचाही असा भावभिना वापर त्यांच्या अनेक गाण्यात आढळतो. सरोद सारखे दरबारी मेहेफील मधले वाद्य व तबल्यावर तालाची पक्की संगत साधणे ह्यामुळे ही सुमधुर गाणी अक्षरशः तीनेक मिनिटांत सादर झालेले रागाचे सादरीकरण ठरत जाते. अशी उच्च संगीतमूल्ये असल्याने श्रोत्यांचा कुठलाही बाजारू अनुनय न करताही ही गाणी पिढ्यानुपिढ्या श्रोत्यांच्या गळ्यातली ताईत बनून राहतात.
वरवर अवघड वाटणारी ही गाणी फक्त दर्दीच नव्हे तर अगदी सर्वसामान्य श्रोत्याच्या ओठांवर रुळत राहतात कारण मदन मोहन वापरत असलेले मखमली सुरीले आवाज. मदन मोहननी लताजींच्या मधुर आवाजाचा केलेला वापर आपल्या काळजाला हाक घालतो. “ लग जा गले”, “जो हमने दास्तां अपनी”, “आप की नझरोने समझा”, “नैना बरसे रिमझिम”, “ तु जहां जहां चलेगा”, “वो भूली दास्तां जो फिर याद आ गायी”, “बैया ना धरो”, “रूके रुके से कदम”, “अगर मुझसे मोहोब्बत है”, अवीट माधुर्याने भरलेला गाण्यांचा हा सिलसिला कधी संपूच नये असे वाटणारा आहे.
तलत मेहमूद आणि महम्मद रफी या दोघांच्या अतिशय मृदू आवाजाचाही अतिशय समृद्ध वापर मदन मोह्ननी केला आहे. चौदा चित्रपटांसाठी तलतजीनी मदन मोहनची गाणी गायली असे जाणकार म्हणतात. “मेरी यादमे तुम ना आसूं बहाना”, “ मै पागल मेरा मनवा पागल”, “ तेरी चमकती आखों के”, “फिर वही शाम”, “तेरी आंख के आंसू पी जाऊ”,यादी अनंत आहे. रफीसाहेबांनी तर मदन मोहन यांची १६८ गाणी म्हटली असे जाणकार म्हणतात. “एक हसीं शाम को दिल मेरा”, “बस्ती बस्ती परबत परबत”, “ तुझे क्या सुनाऊ मै दिलरुबा”, “ मै निगाहे तेरे चेहेरेसे हटाउ कैसे”, “रंग और नूर की बारात किसे पेश करू”, “आपके पहेलू मे आकर रो दिये”, “कर चले हम विदा जान ए तन साथिओ”, एकाहून एक जास्त कर्णमधुर आहेत ही अशी गाणी.
लता-तलत-रफी हे त्रिकुट जरी मदन मोहन यांच्या संगीतविश्वातले मानाचे पान असले तरी इतर गायकांनीही त्यांची गाणी अमर केली आहेत. आशा भोसले यांचे खोडकर “झुमका गिरा रे” अगदी एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात “what झुमका” या अवतारात आपल्या भेटीला येते! किशोर कुमारच्या “ जरुरत जरुरत है शिरीमतीकी” खट्याळ मिष्किलीची मोहिनी फेमिनिझम पलीकडेही मोहविते. मन्ना डेचे “ कौन आया मेरे मनके द्वारे” किंवा “तुम बिन जीवन कैसा जीवन” अजुनही हरेक ऑर्केस्ट्राचा प्रोग्रॅम सजविते.
मदन मोहन च्या सांगीतिक यशात या गायकांपेक्षाही जास्त हात आहे गीतकारानचा. राजा मेहेदी अलीखां, कैफी आझमी, राजेंद्र कीशन, साहीर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी यासारख्या भाषाप्रभूनी मदन मोहनच्या संगीताला एक भारदस्त उंची आणि सघनता दिली. “गझल” ही मदन मोहनची ओळख बनली ती या कवींच्या कलमामुळे. “ जाना था हमसे दूर बहाने बना लिये”, “है तेरे साथ मेरी वफा”, “आप के पहलू मे आकर रो लिये”, “हमसे आया न गया”, “ना तुम बेवफा हो” ही आपली वानगीदाखल काही उदाहरणे.
मदन मोहन जरी असा गंभीर प्रकृतीचा संगीतकार भासला तरी अगदी वाल्ट्झच्या तालावरही त्यांनी गीते रचली आहेत असे मत संगीतज्ञ मांडतात. “ जमी से हमे आसमा पर उठाके गिरा तो ना दोगे” हे गीत या वेगळ्या प्रयोगाचे उदाहरण आहे असे या अभ्यासकांचे मत आहे.
मदन मोहन चे संगीत भावते ते याच सघन श्रीमंत वैविध्यामुळे. यामुळेच मदन मोहनच्या संगीताला फक्त कारुण्यरसात जखडून टाकणे मदन मोहनच्या संपृक्त संगीत विश्वावर अन्याय करण्यासारखे आहे. हा आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपण काही उदाहरणेच पाहूयात, ना. मदन मोहन म्हटले की बहुतेक लोकांना आठवते ते “ लग जा गले” हे अमर गीत. ही प्रीतीगीती निश्चितच विरहाची हुरहूर व्यक्त करते. पण त्या गीतात खरी उत्कट आस आहे ती मिलनाची. आणि ही आस हा अंतरीचा गाढ विश्वास पण आहे. जगाची मृगजळासारखी फसवी प्रलोभने या प्रेमाला भूल घालू नाही शकत ही अंतर्यामीची खूण पण आहे. कवीला अभिप्रेत असलेली प्रेमाची ही असोशी लताच्या स्वरातून मदन मोहन अमर करतात.
“तू जहां जहां चलेगा” सारखे गीत पहा, ना. विरह हा भावच पुसून टाकते हे गीत. “जिथे तू, तिथे मी” आहेच आहे, ही सच्च्या प्रेमाची अतीव असोशी आणि, हो, साफल्यही, मदन मोहन-लताचे हे गीत साजरे करते. “तुम जो मिल गये हो” ह्या गाण्या इतकी सफल प्रेमाची मदहोशी सापडणे अवघड. मदन मोहन चे गान-विश्व अगदी अखेरच्या “वीर-झारा”च्या कहाणीतही “मै यहा हू ” हा विश्वासच व्यक्त करते. थोडक्यात, “ दो पल का” हरेक कारवां म्हणजे “तेरे लिये हम है जिये’’ हा अतूट बंध आश्वस्त मांडणाऱ्या मदन मोहनच्या तरल संगीत विश्वाला या शताब्दी वर्षात मनाचा मुजरा.
प्रतिमा अग्निहोत्री
पुणे
चलभाष: ८३८०९४६९२१